महाराष्ट्र

maharashtra

आरे वृक्षतोड प्रकरणी पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी - मनीषा कायंदे

By

Published : Sep 14, 2019, 7:58 PM IST

येत्या १७ सप्टेंबरला आरे कॉलनीतील सर्व न्यायप्रविष्ट याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे, असे असताना पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. मनीषा कायंदे

मुंबई -महापालिका आयुक्तांकडील इतर कामे संपली आहेत. त्यामुळे ते आरेतील वृक्षतोडीच्या मागे लागले आहेत, असा आरोप आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे नाव न घेता केली.

आरे प्रकरणी आपली भूमिका मांडताना डॉ. मनीषा कायंदे

हेही वाचा -'आरे'वरून 'का'रे.. शिवसेना व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

येत्या १७ सप्टेंबरला आरे कॉलनीतील सर्व न्यायप्रविष्ट याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे, असे असताना पालिका प्रशासनाचा रेटा कशासाठी असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -#SaveAarey ः आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार

आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. आरे कॉलनीत विविध जैवविविधता आहे, त्यांची साखळी निर्माण झाली आहे. यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईकर व पर्यावरणप्रेमी या नात्याने आरेतील वृक्षतोडीला विरोध केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details