मुंबई - भाजपा आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) हे उद्विग्न, भ्रमिष्ट झालेत. त्यांना त्यांच्या पक्षात काही स्थान राहीलेले नाही. एक साधा आमदार असल्याने आता काय करू असा त्यांना प्रश्न पडलेला दिसतोय. त्यामुळे त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. शेलार हे डोक्यावर पडलेले आहेत. सत्ता गेली म्हणून ते तडफडत आहेत अशी संतप्त टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केली आहे. तसेच वरळी येथील सिलिंडर स्फोटात (Worli Cylinder Explosion) वाचलेल्या एकमेव बालकाचे पालकत्व मी स्वतः आणि शिवसेनेने (Shivsena) घेतले असल्याचे महापौरांनी सांगितले.
Kishori Pednekar Criticized Ashish Shelar : आमदार शेलार डोक्यावर पडलेले, सत्ता गेली म्हणून तडफडत आहेत - महापौर पेडणेकर - नितेश राणें
आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पेडणेकर या चांगल्याच संतापल्या आहेत. आमदार आशिष शेलार हे डोक्यावर पडले आहेत. त्यांना पक्षात स्थान राहिलेले नाही. महिलांचा अपमान करताना शेलार यांनी आपण एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे, बहीण, पत्नी या सर्व महिला आहेत याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी शेलार यांना खडेबोल सुनावले आहेत (Mayor Kishori Pednekar Criticized Aashish Shelar).
त्यांना जाणिव राहिलेली नाही
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य (Ashish Shelar's offensive statement Against Mumbai's Mayor) केले असून त्याची दखल महिला आयोगाने (Women's Commission) घेतली आहे. यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) पत्राद्वारे दिले आहेत. याबाबत महापौर पेडणेकर बोलत होत्या. 'आशिष शेलार यांना आपण कोणाविषयी बोलतोय याची जाणिव राहिलेली नाही. 'महापौर कुठे निजल्या', हा शब्द त्यांनी माझ्याबद्दल अनेकदा वापरला. हा एका महिलेचा अपमान आहे. महिलांचा अपमान करताना शेलार यांनी आपण एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. बहीण, पत्नी या सर्व महिला आहेत. याचे भान ठेवले पाहिजे', असे महापौरांनी शेलारांना सुनावले.