महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आरक्षणामुळे गरीब, मागासलेल्या मुस्लीम बांधवांना फायदा होणार' - अबू आझमी ऑन मुस्लीम आरक्षण

राज्यातील मुस्लीम समाजाला मराठा समाजाच्या धर्तीवर अभ्यास करून शैक्षणिक आणि नोकऱ्यांतील आरक्षण देण्याचा कायदा लवकरच आणला जाईल, अशी घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत केली.

abu azami
सपा आमदार अबू आझमी

By

Published : Feb 28, 2020, 6:50 PM IST

Updated : Feb 28, 2020, 7:27 PM IST

मुंबई - सभागृहात आज(शुक्रवार) मुस्लीम आरक्षणावर चर्चा झाली. या आरक्षणामुळे सर्व गरीब व मागासलेल्या मुस्लीम बांधवांना मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया सपा आमदार अबू आझमी यांनी दिली आहे. तसेच भाजप मुस्लिमांच्या विरोधात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सपा आमदार अबू आझमी

राज्यातील मुस्लीम समाजाला मराठा समाजाच्या धर्तीवर अभ्यास करून शैक्षणिक आणि नोकऱ्यांतील आरक्षण देण्याचा कायदा लवकरच आणला जाईल, अशी घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत केली. येत्या शैक्षणिक वर्षांत मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.

आझमी म्हणाले, सदर आरक्षण हे धार्मिक आधारावर दिले नाही, ते असुशिक्षित लोक आहेत जे असे सांगत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. जर, एखाद्या कायद्यामध्ये काही दोष आढळले, तर त्यात सुधारणासुद्धा करण्यात येऊ शकते. आता 5 टक्के आरक्षण शिक्षणात त्वरित देण्यात यावे व उर्वरित प्रलंबित आरक्षण नोकरीसाठी बाकी आहे. याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करून मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्यात येणार असल्याचे अबू आझमी यांनी सांगितले. तसेच यामुळे देशाची प्रगतीच होणार असून, भाजप नेहमीच मुस्लिमांच्या विरोधात असल्याचेही आझमी यांनी सांगितले.

मुस्लीम आरक्षणासंदर्भातली सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -

मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा कायदा लवकरच, नवाब मलिकांची विधानपरिषदेत घोषणा

Last Updated : Feb 28, 2020, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details