मिठी नदी भरली; मोरारजी नगरचा सबवे तात्पुरता वाहतूकीसाठी बंद - pavai dam
मुंबईत पावसाची संततधार सुरू असून मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पवई वरून अरे कॉलनी कडे जाणाऱ्या मोरारजी नगरच्या सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्याने हा रस्ता पोलिसांनी कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बंद केला आहे. उपनगरांमध्ये जायचे असल्यास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडचा उपयोग करण्यात यावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
मुंबई- काल रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबई उपनगरातील विहार तलाव आणि पवई तलाव तुडूंब भरले आहेत. या दोन्ही तलावांतील सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी मिठी नदी मध्ये येत आहे. परिणामी मिठी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पवई वरून अरे कॉलनी कडे जाणाऱ्या मोरारजी नगरच्या सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्याने हा रस्ता पोलिसांनी कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बंद केला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये जायचे असल्यास जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडचा उपयोग करण्यात यावा असे आवाहन पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोपळे यांनी केले आहे.