मुंबई - मुंबईतील कोरोनाच्या दृष्टीने सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील धारावी कोळीवाडा परिसरात आता थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून या कामाला सुरुवात होणार असून संशयित आणि कॊरोना बाधित रुग्ण शोधून काढण्याचे मोठे आव्हान इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य टीम समोर असणार आहे.
उद्यापासून मिशन धारावी कोळीवाडा, आयएमए आणि पालिकेकडून होणार स्क्रिनिंग - कोळीवाडा परिसरात आता थर्मल स्क्रिनिंग सुरू
कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील धारावी कोळीवाडा परिसरात आता थर्मल स्क्रिनिंग सुरू करण्यात येणार आहे. उद्यापासून या कामाला सुरुवात होणार असून संशयित आणि कॊरोना बाधित रुग्ण शोधून काढण्याचे मोठे आव्हान इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य टीम समोर असणार आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी कॊरोनाचा शिरकाव झाला आणि प्रशासनाची झोप उडाली. त्यानंतर धारावीतील रहिवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. साडे सात लाख लोकवस्ती असलेल्या या झोपडपट्टीत स्क्रिनिंग करण्यासाठी आयएमएचे डॉक्टर पुढे आले. 10 एप्रिलला धारावीतील मुकुंद नगरसह 5 हॉटस्पॉटमध्ये 8 दिवसातच डॉक्टरांच्या टीमने 40 हजार रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण केले. यात 210 जणांच्या चाचण्या केल्या. शेकडो जणांना क्वारंटाइन तर हजारोना होम क्वारंटाइन केले. आता हे काम संपल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने धारावी कोळीवाड्याकडे मोर्चा वळवला आहे.
उद्यापासून इथे थर्मल स्क्रिनिंग सुरू होईल. त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाल्याची माहिती आयएमएचे पदाधिकारी डॉ. अनिल पाचणेकर यांनी दिली आहे.