महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2019, 9:22 AM IST

Updated : Nov 25, 2019, 10:22 AM IST

ETV Bharat / city

'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आमदारांपैकी 3 आमदार सोमवारी मुंबईत पोहोचले आहेत. यात आमदार अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॉट रिचेबल असलेल्या चार आमदारांपैकी तीन आमदार आज सोमवारी सकाळी मुंबईत परतले आहेत. यात अनिल पाटील व दौलत दरोडा, नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार मुंबईत दाखल...

हेही वाचा... अजित पवार ट्विटर स्वतः चालवतात की एजन्सी? नवाब मलिकांनी व्यक्त केली शंका

दिंडोरी नाशिकचे आमदार नरहरी झिरवळ हे सोमवारी सकाळी दिल्लीहून 4 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईत आणले गेले.

हेही वाचा.. बहुमत भाजपच सिद्ध करणार; रवी राणा म्हणतात 'ये अंदरकी बात है'

सध्या आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा, हे हॉटेल हयात येथे आहेत. येथेच पक्षाचे अन्य आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान आणि धीरज शर्मा यांनी त्यांना दिल्लीहून मुंबईत आणले.

Last Updated : Nov 25, 2019, 10:22 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details