मुंबई -शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या शालेय शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. मात्र, शुल्क कपातीचा आदेश राज्यातील पालकांचा दिशाभूल करणार आहे. इतकेच नव्हे तर या निर्णयाचा फायदा खासगी शाळांना होणार असून पालकांचा काही फायदा झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयावर पालकांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे.
खासगी शाळांचा फायदा होणार -
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली आहे. अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकांवर विपरीत परिणाम झाला असून कुटूंबियांच्या उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे. तसेच मुलांच्या शिक्षण पद्धतीत बदल होऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वीकारली गेली आहे. मात्र अशा आर्थिक संकटकाळात सुद्धा खासगी शाळेकडून फी वाढ करण्यात आली होती. तसेच काही शाळा अव्वाच्या सव्वा फी पालकांकडून वसूल करण्यात येत होते. त्यामुळे पालक संघटनांनी शालेय शुल्क वाढीविरोधात आक्रम झालेल्या होत्या. तसेच शालेय शुल्क कपातीची मागणीही पालकांनी शासनाकडे केली होती. याशिवाय राजस्थान सरकारविरुद्ध खासगी संस्थाचालक या निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्याच मे २०२१मध्ये दिलेल्या निकालाचा संदर्भ न्यायालयाने दिला होता. यानिकालाच्या आधारे शालेय शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा राज्य सरकारने शासन आदेश जारी केला आहे. मात्र, शासनाचा निर्णय खासगी संस्था फायदा देणार असून पालकांची दिशाभूल करणार हा निर्णय असल्याचा आरोप ऑल इंडिया पेरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेचे अनुभा शहा अनुभवा शहा यांनी केला आहे.