मुंबई- शहरातील गोवंडी परिसरातील शिवाजीनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली. मृत शिक्षिकेचे नाव आयेशा अस्लम हुसीये (वय 30), असे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आयेशाकडे हा विद्यार्थी शिकवणीसाठी येत होता. तर ही शिक्षिका अल कौसर उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. सोमवारी रात्री काही मुले शिकवणीसाठी आली होती. त्यावेळी हा अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा आला होता. रात्री आठ वाजता शिकवणी संपल्यावर सर्व मुले घरी गेले. त्यानंतर या मुलाने या शिक्षिकेच्या घरातील चाकू घेतला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या पोटात पाठीत आणि मानेवर अनेक वार केले. त्यानंतर ही शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात पडली.