महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भय इथले संपत नाही...अल्पवयीन मुलींवरील शारीरिक आत्याचाराच्या घटनेत वाढ - mumbai rape

शहरात मागील काही महिन्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या ९४ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत जानेवारी २०२० ते जून २०२० या काळात लहान मुलींवर बलात्कार, विनयभंग व शारीरिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून हा चिंतेत भर पडलीय.

crime in mumbai
भय इथले संपत नाही...अल्पवयीन मुलींवरील शारीरिक आत्याचाराच्या घटनेत वाढ

By

Published : Jul 24, 2020, 12:59 PM IST

Updated : Jul 24, 2020, 6:22 PM IST

मुंबई - शहरात मागील काही महिन्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या ९४ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत जानेवारी २०२० ते जून २०२० या काळात लहान मुलींवर बलात्कार, विनयभंग व शारीरिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून चिंतेत भर पडलीय.

भय इथले संपत नाही...अल्पवयीन मुलींवरील शारीरिक आत्याचाराच्या घटनेत वाढ
अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेत वाढमागील सहा महिन्यात शहरातील विविध ठिकाणी बलात्काराच्या ३२४ घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १३९ अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनात आतापर्यंत ९१ प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून एप्रिल ते जून या महिन्यात मुंबईत ३० अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आहे. एप्रिल महिन्यात पाच तर मे महिन्यात चार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जून महिन्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना वाढल्या असून त्यांची संख्या २१ झाली आहे.अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ जानेवारी २०२० ते जून २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या मोठ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. यामध्ये मुंबई पोलिसांनी आता पर्यंत २७३ प्रकरणांचा छडा लावलाय. एप्रिल २०२० ते जून २०२० या लॉकडाऊन काळात मुंबईत १११ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. यातील ४७ प्रकरणांतील मुलींची सुखरुप सुटका झाली आहे.

काय आहे कायदा?

अल्पवयीन मुलामुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासाठी २०१२ साली पोक्सो अंतर्गत कायदा अंमलात आणण्यात आला. त्यामध्ये आरोपीला ३ वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतुद आहे. विशेष न्यायालयात याचा खटला चालवण्यात येतो.

Last Updated : Jul 24, 2020, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details