मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'ला कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. याबाबतची मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी मागणी केली, ती मागणी तातडीनं मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
'राजगृह'ला आता पोलिसांचा खडा पहारा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगृहाचा कडेकोट बंदोबस्ताचा निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. विविध समाजघटकाकडून याबाबत तीव्र निषेध व्यक्त झाल्याने राज्य सरकारने तातडीने निर्देश देत याबाबत कडक पोलीस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकाळीच निषेध व्यक्त करुन चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ते यासंबंधीचे पडसाद उमटले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. विविध समाजघटकाकडून याबाबत तीव्र निषेध व्यक्त झाल्याने राज्य सरकारने तातडीने निर्देश देत याबाबत कडक पोलीस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकाळीच निषेध व्यक्त करुन चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ते यासंबंधीचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड गृहमंत्री आणि देशमुख आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध होत असून समाजाच्या सर्व स्तरातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला गेला होता.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.