महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'एटीएस'च्या तपासात राज्य सरकारमधील मंत्री हस्तक्षेप करतायेत - आशिष शेलार

राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने ठाण्याच्या न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्राच्या एनआयएकडे कागदपत्रे आणि पुरावे पाठवले आहेत, असे सांगताना शेलार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

mla ashish shelar
आशिष शेलार

By

Published : Mar 26, 2021, 3:17 PM IST

Updated : Mar 26, 2021, 4:46 PM IST

मुंबई -मनसुख हिरेन यांच्या मृत्युचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत आहे. पण या संपूर्ण एटीएसच्या तपासात राज्य सरकारमधील काही मंत्री आणि नेते हे हस्तक्षेप करत आहेत, असा आरोप भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत लावला आहे. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप लावत या सरकारमधील काही मंत्री हे सचिन वाझे याच्या पाठीशी आहेत आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासात हस्तक्षेप करत आहेत. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचं काम सुरू आहे. ही खूप गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी या सरकारवर लावले आहेत.

आशिष शेलार

एटीएसच्या तपासात मंत्री हस्तक्षेप करतायेत -

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून त्यांचा शवविच्छेदन होईपर्यंत अनेक ठिकाणी पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आल्यानंतर आपण एनआयएला पत्र पाठवल्याचे शेलार यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणात डॉक्टर, लॅबोरेटरीमधील तज्ञ, पोलीस यांना निर्देश देणारे राजकारणी नेते यांची सर्वांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद केली.

हेही वाचा -महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी

हिरेन प्रकरणातल्या पुराव्यांशी छेडछाड केली -

राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने ठाण्याच्या न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्राच्या एनआयएकडे कागदपत्रे आणि पुरावे पाठवले आहेत, असे सांगताना शेलार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणात प्रश्न असा आहे की, राज्य सरकार मनसुख हिरेन यांच्या खुनाची केस स्वतःकडे का ठेवू पाहत आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणांमध्ये राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्या निर्देशानुसार मोठे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केलेला आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यांमध्ये फेरफार करणे, चौकशी भरकटून लावण्याचा प्रयत्न हे राज्य सरकारने चालवत आहे, असा आरोपही शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

शेलार यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून त्यांचे शवविच्छेदनापर्यंत अनेक ठिकाणी कशा प्रकारे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला या संदर्भात माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामध्ये हिरेन यांच्या शरीरावरील रुमालाचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसणे, गरज नसणाऱ्या चाचण्या करणे, एटीएसच्या कारवायांमध्ये अडथळा आणणे, असे अनेक प्रकार घडल्याचा दावा केल्याने या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून हे निर्देश देणारे नेते आणि राजकारणी कोण आहे? याचाही शोध घ्यावा अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा -विशेष: 'या' आहेत रुग्णालयांतील आगीच्या ह्रदयद्रावक दुर्घटना

Last Updated : Mar 26, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details