मुंबई -कोविड १९ ( Covid 19 ) काळात राज्यात अनाथ झालेली मुले ( Orphans ) आणि विधवा महिलांसाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार 'मिशन वात्सल्य' ( Mission Vatsalya ) राबविण्यात येत आहे. हे मिशन सध्या ३४५ तालुक्यांमध्ये ( Mission Vatsalya Scheme In 345 Talukas ) कार्यान्वित झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ( Women and Child Development Minister Yashomati Thakur ) यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट राज्यासमोर आ वासून उभे ठाकले आहे. या काळात नागरिकांनी पुन्हा एकदा सतर्कता बाळगून कोरोनाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी ही बालकांच्या लसीकरणा ( Vaccination of Childrens ) संदर्भात राज्य सरकार पूर्णतः खबरदारी घेत असून त्याबाबत योग्य पावले उचलली जात आहेत. कोविड काळामध्ये अनाथ झालेल्या बालकांसाठी राज्य सरकारने 'मिशन वात्सल्य' ( Mission Vatsalya Scheme ) ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
- 'अनाथ बालकांच्या संगोपनाची जबाबदारी'
राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची एकूण संख्या ६६८ असून यापैकी त्यांच्या नातेवाइकांकडे ६३८ बालकांना सोपविण्यात आले आहे. तर उरलेल्या तीस मुलांना काळजी आणि संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बालकांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असणाऱ्या नातेवाईकांचा शोध सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांची एकूण संख्या २१ हजार ६७८ इतकी आहे. एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश बालकल्याण समितीकडून देण्यात आलेले आहेत. या बालकांना दरमहा अकराशे रुपये इतके परिपोषण अनुदान देण्यात येत आहे. तसेच एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या बालकांचे शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क किंवा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी रुपये दहा हजार इतक्या कमाल मर्यादेपर्यंत एका बालकास एक वेळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- ३४५ तालुक्यात योजना कार्यान्वित