मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या उस्मानाबाद येथे लवकरच स्वतंत्र विद्यापीठ होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून येथे विद्यापीठाचे उपकेंद्र होते. मात्र, विद्यार्थ्याना त्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या उपकेंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, अशी मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश दिलेत.
उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.
उस्मानाबादमध्ये होणार विद्यापीठ; उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले समिती गठित करण्याचे आदेश - कुलगुरू डॉ. प्रमोद येवले
उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.

सामंत म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भोगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गठीत केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनांकडे सादर करावा.आशा सूचनाही सामंत यांनी केल्या.
या बैठकीस उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.