मुंबईकोरोनाच्या 2 वर्षात राज्यातील हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेले आहेत. अनेक उद्योग बंद झाले, अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. अशा काळात ज्या तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या तरुणांना सर्वात आधी नोकरी मिळावी. Jobs first for unemployed Corona era त्यानंतर अन्य कामगारांचा विचार संबंधित उद्योगांनी करावा, अशा सूचना आपण सर्व उद्योगांना देणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे Minister Suresh Khade यांनी दिली. कामगार मंत्री आपण पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात आधी कामगारांच्या सुरक्षेविषयी काही मार्गदर्शक सूचना आणि योजना आणणार आहोत असेही खाडे यांनी स्पष्ट केले आहे.
कामगार कायद्यांचे स्वागतWelcome of labor laws केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले असून कामगारांसाठी आता केवळ 4 महत्त्वाचे कायदे असणार आहेत. या चार कायद्यांमध्ये कामगारांच्या संपूर्ण हिताचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे हे कायदे अत्यंत महत्त्वाचे आणि कामगारांच्या कल्याणासाठीच आहेत, असा दावा डॉक्टर सुरेश खाडे यांनी Minister Suresh Khade Order केला आहे. दरम्यान या कायद्यांची अंमलबजावनी कशा पद्धतीने करता येईल, याबाबत आम्ही लवकरच विचार करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे.