महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नथुराम गोडसेंचा जन्म 'बारामती'ला झाला, मुनगंटीवारांच्या पलटवाराने सभागृहात विरोधकांची वळली 'बोबडी'

सरकार महात्मा गांधींऐवजी त्यांच्या मारेकऱ्यांचा उदो उदो करत असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाल्याचा पलटवार विरोधकांवर केला. त्यामुळे विरोधकांची चांगलीच बोबडी वळाली. मुनगंटीवारांनी थेट बारामतीकरांवरच टीका केल्याने सभागृहात याबाबत चांगलीच चर्चा रंगली.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 26, 2019, 10:11 AM IST

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाबाबत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारच्या काळात महात्मा गांधींऐवजी त्यांचे खुनी नथुराम गोडसेचा उदो उदो केला जात असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर पलटवार करताना नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाला असा पलटवार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे विरोधकांची चांगलीच 'बोबडी' वळली.

मुनगंटीवारांनी विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालत गोडसेंवरुन थेट 'बारामतीकरां'वरच निशाणा साधला. मुनगंटीवार यांच्या पलटवाराने खुद्द अजित पवार यांनाही मुनगंटीवार यांच्या पलटवाराला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला. आम्हाला हे आत्ताच माहिती झाले, इतकेच अजित पवार बोलू शकले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने राज्य सरकार कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मात्र कार्यक्रमावर विरोधक टीका करत आहेत. विरोधकांनी या कार्यक्रमाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details