महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2019, 5:45 PM IST

ETV Bharat / city

'बार्टीच्या धर्तीवर ओबीसी, एसबीसी, व्हीजे एनटीसाठी स्वायत्त संस्था स्थापन करणार'

मराठा समाजासाठी 'सारथी' आणि मागास प्रवर्गासाठी असलेल्या 'बार्टी' या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गासाठी नवीन स्वायत्त संस्था स्थापन केली जाणार असल्याची माहिती मंत्री संजय कुटे यांनी दिली.

मंत्री संजय कुटे

मुंबई- राज्यात मराठा समाजासाठी 'सारथी' आणि मागास प्रवर्गासाठी असलेल्या 'बार्टी' या दोन्ही संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, (व्ही जे एन टी), इतर मागासवर्ग (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गासाठी राज्यात एक नवीन स्वायत्त संस्था स्थापन केली जाणार आहे. याबाबतची माहिती मंत्री संजय कुटे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाच्या माध्यमातून दिली.

मंत्री संजय कुटे


या संस्थेसाठी एक अभ्यासगट समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर महिन्याभरात सरकारकडून मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. राज्यात अशा प्रकारे या समाजाला न्याय देणारी स्थापन होणारी पहिलीच स्वायत्त संस्था असून यामुळे लाखो तरुणांना याचा लाभ मिळणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.


सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीसाठी स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमातून या प्रवर्गातील तरुण-तरुणींचे मोठे हित साधले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने ही संस्था पुण्यात लवकरच उदयास येईल, अशीही माहिती कुटे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details