महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

World Health Day : जागतिक आरोग्य दिन उपक्रमात मंत्री राजेश टोपे, आदित्य ठाकरेंनी घेतला सहभाग

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे योगधारणा व आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात ( World Health Day In Mumbai ) आले. यावेळी मंत्री, अधिकाऱ्यांनी ध्यानधारणा कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

जागतिक आरोग्य दिन उपक्रमात मंत्री राजेश टोपे, आदित्य ठाकरेंनी घेतला सहभाग
जागतिक आरोग्य दिन उपक्रमात मंत्री राजेश टोपे, आदित्य ठाकरेंनी घेतला सहभाग

By

Published : Apr 7, 2022, 8:55 PM IST

मुंबई - राज्यात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने योगधारणा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ केल्या जाणाऱ्या उपाय योजनाबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात ( World Health Day In Mumbai ) आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी यात सहभाग घेतला.


मंत्री, अधिकारी झाले सहभागी : नियमित धारणेमुळे आरोग्य सुधारते. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. शरीराची पचनशक्ती सुधारते. उत्तम राहते आणि श्वसनाचे आजार, हृदयविकार, मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. योगामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होण्यास मदत होते. भीती, अस्वस्थता, कंटाळा, तणाव, नैराश्य, चीडचिडेपणा अशा विकारावर मात करता येते. मनावर ताबा कसा मिळवता येतो, हे ध्यानधारणेतून विस्तृत करण्यात आले. दरम्यान, १० मिनिटे ध्यानधारणा करण्यात आली. मंत्री, आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थांसह उपस्थितांनी भाग घेतला.

प्रात्यक्षिके दाखवली : डॉ. मकरंद पाटील यांनी ध्यान धारणा करताना आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात. अशावेळी शास्त्रीय दृष्टीने काय उपाययोजना करून संबंधीचा जीव वाचू शकतो, किंवा काय मदत करू शकतो याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. सातवी, आठवीपासून पुढील वर्गातील शिक्षण अभ्यासक्रमात असे उपक्रम राबवायला हवेत. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेवर, वैद्यकीय संरक्षण मिळेपर्यंत मात करणे सोपे होईल. भूल तज्ञांच्या संस्थेने पाच मिनिटांची प्रात्यक्षिके दाखवली.

ABOUT THE AUTHOR

...view details