महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Raut : भाजपचा आरोप पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळला - नितीन राऊत - rajya sabha election 2022

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन मतांवर भाजपने आक्षेप घेतला होता. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

minister nitin raut
नितीन राऊत

By

Published : Jun 10, 2022, 3:20 PM IST

Updated : Jun 10, 2022, 3:33 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन मतांवर भाजपने आक्षेप घेतला होता. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असताना महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांनी मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचा ठपका भाजपने ठेवला होता.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत

पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी यावर आक्षेप घेत, हे मत बाद करावे, अशी मागणी केली. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार यामुळे निवडून येतील, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -राज्यसभेच्या ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार अनिल बोंडे यांचे पोलिंग एजंट अतुल सावे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीची तीन मतं बाद करण्याची मागणी त्यांनी केली ( Exclude 3 votes of Mahavikas Aghadi ) आहे. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची ( presiding officer rejected bjps demand ) माहिती मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी दिली आहे.

हेही वाचा -RS Election 2022 : महाविकास आघाडीची 3 मतं बाद करण्याची भाजपची मागणी पीठासन अधिकाऱ्यांनी फेटाळली

Last Updated : Jun 10, 2022, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details