महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Load Shedding : वीज जपून वापरा, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आवाहन - Use Electricity Careful

सध्या राज्यात विजेची टंचाई भासू लागली असून त्यावर सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जनतेने ऊर्जेचा वापर जपून करावा, असे आव्हान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेला केले ( Use Electricity Careful ) आहे. लोडशेडिंगचे वेळापत्रक आम्ही लोकांना सांगू, असेही ते ( Load Shedding in Maharashtra ) म्हणाले.

नितीन राऊत
नितीन राऊत

By

Published : Apr 21, 2022, 9:18 PM IST

मुंबई- ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सध्या राज्यात भासू लागलेल्या विजेच्या टंचाईबाबत चर्चा केली. एकंदरीत ही विजेच्या प्रश्नावर संपूर्ण आढावा बैठक होती. ही बैठक सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत ऊर्जा विभागाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यात विजेची टंचाई भासू लागली असून त्यावर सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जनतेने ऊर्जेचा वापर जपून करावा, असे आव्हान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेला केले ( Use Electricity Careful ) आहे.

राज्यात लोड शेडिंगला सुरुवात -यावेळी ते म्हणाले, दरवर्षी एप्रिलमध्ये तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते. पण, या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर यंदा कोरोनानंतर सर्व जनजीवन सुरळीत झाल्याने सर्व उद्योग धंदे, कार्यालय पूर्णता सुरू झालेली आहेत. त्यामुळेही विजेचा भार वाढला आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कोळशाच्या खाणीत पाणी भरल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचसोबत देशात नऊ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोडशेडिंग सुरू झालेले ( Load Shedding in Nine States ) आहे. आता महाराष्ट्रातही लोडशेडिंग सुरू झाले आहे.

विजेच्या चोऱ्या रोखणे गरजेचे -कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत कोळसा मंत्रालय रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवत आहे. राज्यात सध्या 14 हजार 500 मेगावॅटचा तुटवडा भासत आहे. कारण अदानिने पुरवठा कमी केला आहे. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. लोडशेडिंगचे वेळापत्रक आम्ही लोकांना सांगू, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर बाहेरून कोळसा घ्यायला वेळ लागणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पाऊस पडला तर भारनियमन ( Load Shedding ) कमी होईल. जी वन, जी टू, जी थ्री या ठिकाणी बिल भरले जात नाही, विजेच्या चोऱ्या होत आहेत अशा ठिकाणी भारनियमन केले जाणार आहे. वीज प्रश्नावर भाजप आंदोलन करत आहे. त्यांनी विशेषतः चंद्रकांत पाटलांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा -Ministers Covid Treatment Bill : मंत्र्यांचा सरकारी वैद्यकीय सेवेवर अविश्वास का? - आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details