महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा - नवाब मलिक - central government

भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल-डिझेलचा भाव कमी होत राहणार आणि केंद्राची ही सततची लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे.

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक

By

Published : Nov 4, 2021, 3:16 PM IST

मुंबई- भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल-डिझेलचा भाव कमी होत राहणार आणि केंद्राची ही सततची लूट थांबवायची असेल तर भाजपला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे.

बोलताना मंत्री नवाब मलिक

पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी कमी

केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव पाच तर डिझेलचा भाव दहा रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्याप्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, मागील सहा महिन्यात पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना त्याचा एकूणच परिणाम सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, अशा
परिस्थितीत दर कमी करून तुटपुंजी मदत केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

भाजप हरावो दाम घटावो

दरम्यान, जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. पण, ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात 'भाजप हराओ दाम घटाओ' असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाल्याचे नवाब मलिक म्हणाले. आंदोलनाने भाव कमी होणार असतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये अशा पद्धतीचे आंदोलन वारंवार केले जाईल, जेणेकरून दर कमी होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा -'तेजोमय प्रकाशपर्व आरोग्य, सुख,समृद्धी घेऊन येवो'

ABOUT THE AUTHOR

...view details