महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अर्धे काय पूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही कुणाला घाबरणार नाही! - मंत्री नवाब मलिक - fadnavis comment central investigation agency

अर्धे काय, पूर्ण टाका ना मंत्रिमंडळ तुरुंगात, आम्ही कुणाला घाबरणार नाही, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला असता तर, अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते, असे वक्तव्य केले होते. त्यावर मलिक यांनी हे उत्तर दिले.

central investigation agency nawab malik comment
मंत्रिमंडळ तुरुंग प्रतिक्रिया नवाब मलिक

By

Published : Oct 16, 2021, 6:44 PM IST

मुंबई -प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला असता तर, अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्धे काय, पूर्ण टाका ना मंत्रिमंडळ तुरुंगात, आम्ही कुणाला घाबरणार नाही, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

माहिती देताना मंत्री नवाब मलिक

हेही वाचा -नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल

बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसांत बाहेर काढू

सत्तेचा गैरवापर करायचा असेल तर तुम्ही कितीही लोकांना तुरुंगात टाकू शकता, परंतु आम्ही घाबरणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना त्यांनी सावधपणे आरोप केले पाहिजे, असे सांगतानाच 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. दरम्यान बरेचसे उंदीर आम्ही काही दिवसांतच बाहेर काढू, असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

काय म्हणाले होते फडणवीस?

केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना आणि नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. या वक्तव्याचा धागा धरत देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला असता तर, अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते.

हेही वाचा -मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. प्रत्येक विकेन्डला सायन उड्डाणपूल राहणार बंद, एमएसआरडीसीचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details