महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एमआयएम चा आघाडीला प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी "हनी ट्रॅप"! - मंत्री जितेंद्र आव्हाड - हनी ट्रॅप जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया

एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी समोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव म्हणजे महाविकासआघाडी साठी "हनी ट्रॅप" असल्याची शंका राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad comment on MIM ) यांनी व्यक्त केली.

Minister Jitendra Awhad comment on MIM
एमआयएम प्रस्ताव जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया

By

Published : Mar 21, 2022, 2:06 PM IST

मुंबई -एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी समोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव म्हणजे महाविकासआघाडी साठी "हनी ट्रॅप" असल्याची शंका राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad comment on MIM ) यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना मंत्री जितेंद्र आव्हाड

हेही वाचा -Russia-Ukraine War 26Th Day! चीनने रशियाला लष्करी मदत करु नये; अन्यथा गंभीर परिणाम -अमेरिका

आम्ही नाही म्हणत असताना एमआयएम पक्ष आम्हाला येऊन जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे. कडकडीत मिठी मारून आम्हाला त्यात गुदमरून मारण्याचा प्रयत्न तर केला जाणार नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. या हनी ट्रॅप मागे नाव न घेता भाजप असल्याची शंका त्यानी व्यक्त केली. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शंका व्यक्त केली. तसेच, एमआयएम च्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी आव्हाड यांनी सांगितले.

काँग्रेस विचाराचे अनिल बोंडे कट्टरवादी हिंदू कधी झाले

हिंदुत्ववादी विचार केला नाही तर आपल्या घरातील महिलांना पुढील काळात हिजाब घालून फिरावे लागेल, असे वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केल. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घेण्यात आला असून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये असलेले काँग्रेस विचारांचे नेते अनिल बोंडे आता मात्र भारतीय जनता पक्षात जाऊन गेल्या काही दिवसांपासून आपल्याला कट्टरवादी हिंदू दाखवून देण्यासाठी कार्यक्रम घेत आहेत. म्हणून कॉंग्रेस विचारांचे अनिल बोंडे कट्टरवदी हिंदू कधी झाले, असा टोला जितेंद्र आव्हाड यानी लगावला.

इतिहासकरांमुळे शिवजयंतीच्या तारखेचा घोळ

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गठीत केलेल्या समितीने 19 फेब्रुवारी ही शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख निश्चित केली. त्यानुसारच आता शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, काही इतिहासकारांनी घातलेल्या घोळामुळेच शिवजयंतीच्या तारखेचा घोळ निर्माण झाला असल्याची खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. मात्र, शिवाजी महाराज हे एवढे मोठे व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांचा आदर्श कोणीही विसरणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Mumbai Tree Falls : मुंबईत हॉटेलच्या शेडवर झाड कोसळून एकाचा मृत्यू

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details