मुंबई - 'ओबीसींवर माझा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते', असं खळबळजनक वक्तव्य ( Jitendra Awhad Controversial Statement On OBC ) गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आता यावर पडसाद उमटायला सुरुवात झाली असताना, माझं वाक्य तोडून मोडून दाखवण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले ( Jitendra Awhad Over Controversial Statement )आहे. तसेच ओबीसींना मंडल आयोग हा दलित जनतेमुळेच मिळाला असल्याचंही ते ( Jitendra Awhad On Mandal Ayog ) म्हणाले. मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात केल्याप्रसंगी ते बोलत होते.
काय म्हणाले आव्हाड!
माझं वाक्य तोडून-मोडून- फोडून टाकायचं हे काम आहे. मंडल आयोग व्ही. पी. सिंग यांनी मान्य केलंय. त्या विरोधात कमंडलू राजकारण कोणी सुरू केलं. त्या कमंडलूच्या यात्रेत कोण कोण होतं. त्यामुळे त्यांनी मला ओबीसी शिकवू नये. मी आता पुनरुच्चार करतो, की मंडळ आयोग हा केवळ शरद पवार आणि तिथल्या दलित समाजामुळे आला आहे. ओबीसीला मिळालेला मंडल आयोग हा केवळ दलित जनतेमुळे मिळाला आहे. यात मला कोणी चुकीचं ठरवलं तरी मान्य.. पण, इतिहास पुसू शकत नाही. आरोप करणाऱ्यांनी ते होते कुठे हे सांगावं.. मग आपण पुढचं बोलू असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी : दरेकर