मुंबई -दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. मात्र, गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यंदा पाणीटंचाई राज्यात होणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी केला आहे.
राज्यात ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक -यंदा राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून ३ हजार २६४ धरणांमध्ये सरासरी ६२.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा ५३.२४ टक्के इतका होता. नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त असून ते ५०.०६ टक्के इतका जलसाठा आहेत. गेल्या वर्षी हा जलसाठा ४६.७२ टक्के इतका होता. तर सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा विभागातील यांना पाणीसाठा उपलब्ध असून मराठवाड्यातील ९६४ धरणांमध्ये ६५.०६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.