मुंबई -शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा, असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तरप्रदेश आणि इतर निवडणुकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil on Ukraine situation ) यांनी लगावला आहे. ते मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रशियाने युक्रेनवर हल्ला ( Russia invasion on Ukraine ) केला आहे. अशा परिस्थितीत भारतातील विद्यार्थी अडकले आहेत. त्याबाबत विचारले असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटची आठवण ( Jayant Patil on Indians in Ukraine ) करून दिली. ज्यावेळी निवडणुका देशात सुरू होतात, त्यावेळी केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो, असा अनुभव आहे.
हेही वाचा-Russia Ukraine Crisis : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इशारा.. रशियाने नाटो देशांत प्रवेश केला तर अमेरिका करेल 'असं' काही
तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते...
युक्रेनमध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा, असे आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्वीटच्या माध्यमातून वेधले होते. परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही, युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. ट्वीट करुन मुलांना परत आणण्याबाबतची मागणी केली होती. त्याचवेळी प्रयत्न केला असता तर, आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती. परंतु केंद्रसरकारने घेतली नाही अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
हेही वाचा-Russia-Ukrain Crisis : रशिया-यूक्रेनच्या वादाचे खरे कारण काय? सर्व माहिती फक्त एका क्लिकवर...