महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा; लवकरच मिळणार स्वाधार योजनेतील निधी - धनंजय मुंडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी मुंडे सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

dhananjay mundhe
धनंजय मुंडे

By

Published : Aug 28, 2020, 10:01 PM IST

मुंबई - दहावी आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या परंतु वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज वितरित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संलग्न खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे यांच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दहावीच्या पुढील उच्च शिक्षणासाठी वाढलेली स्पर्धा लक्षात घेत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो. कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांना सुधार योजनेतील निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांना निर्बंध लागलेले असून राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये यासाठी मुंडे सतत प्रयत्नशील होते. त्यामुळे अर्थ खात्याने तातडीने यासाठी ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. यामुळे मुंडे यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच या योजनेची व्याप्ती मोठ्या शहरांपूरती मर्यादित न ठेवता ती वाढवून तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची बाकी असलेली देयके देण्यासाठी तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून वितरित केल्याने कोविडच्या या काळात विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. याबद्दल गेल्या काही दिवसांपासून मागणी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details