मुंबई -नवाब मलिक यांच्यावर सुडाचे राजकारण केले जात आहे. म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न येत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal talk on nawab malik resignation ) यांनी सांगितले. नवाब मलिक याना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
हेही वाचा -Nawab Malik Arrested : नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोजचा तलवार नाचवून जल्लोष
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर, काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुनील केदार हे नेते उपस्थित होते. या नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवार, छगन भुजबळ महा विकास आघाडीचे नेते यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाऊ नये, असे ठरल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.