मुंबई - शेतकरी आंदोलन संदर्भात ट्विट केल्याप्रकरणी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींची घरी जाऊन चौकशी केली जाणार नसून, संबंधित ट्विटची केवळ माहिती घेतली जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा सन्मान राखलाच पाहिजे म्हणत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा -‘आय लव्ह यू ऋषिकेश...’ म्हणत जळगावातील विद्यार्थिनीची 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या
भाजप केवळ मुद्द्यांच्या शोधात असून त्यांना केवळ राजकारण करण्यात रस असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच शेतकरी उन, पावसाचा मारा सहन करत आंदोलन करत आहेत. यावर काही आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनी सहानुभूतीने ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील कलाकार आणि खळाडू यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट एकाच दिवशी केलं गेलं असून काही ट्विटमध्ये शब्दशः साम्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी. तसेच हे ट्विट कोणाच्या आदेशाने केले आहेत का? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आल्याने या संदर्भात चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.