मुंबई -राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलै या दोन दिवसात पार पडणार आहे. या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही. राज्यात असलेले कोरोनाचे संकट पाहता झालेल्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
केंद्रीय कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, हे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे या कृषी कायद्या संदर्भात सुधारणा कायद्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यांना देशात मोठा प्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध राज्य सरकारकडे काही समाज सुधारकांनी भेट घेऊन या कायद्यासंदर्भात चर्चा केली, असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
'महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा सुरू'