महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 14, 2020, 6:29 PM IST

ETV Bharat / city

'मूग, उडीद खरेदीकरिता न शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करावी'

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना उडीद व मूग विक्रीसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय सरकारने दिला आहे. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे.

बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील

मुंबई- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्यापासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने प्रति क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूगासाठी हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग व उडीदाची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद व मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. सर्व खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

ऑनलाइन खरेदी नोंदणीसाठी हे करा....

  • शेतकऱ्यांनी तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
  • नोंदणीकरिता आधारकार्डाची छायाकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा.
  • तसेच शेतकऱ्यांनी मोबाइल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.
  • नोंदणी केलेल्या केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा.

केंद्र शासनाकडे हमीभावाने मूग व उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव ३१ ऑगस्टला पाठविण्यात आल्याची माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती मिळाली. त्याला लवकरच मान्यता अपेक्षित आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details