मुंबई -काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या केवळ अफवा उडवण्यात आले आहेत काँग्रेसचे आमदार नाराज नाहीत त्यांनी केवळ आपल्या नेत्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचा दावा काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी केला आहे. राज्यातील काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र प्रशिक्षणासाठी गेलेल्या आमदारांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यात गैर नाही. त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची नाराजी व्यक्त केली नाही. महाविकास आघाडीमध्ये आपण नाराज नाही, असा दावा काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी केला आहे.
'विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावे' : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये मशिदीवरील भोंगे उतरवा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. मात्र असलेले धार्मिक मुद्दे घेण्यापेक्षा मुंबईचा विविध प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायला हवे असेही असलम शेख यांनी सांगितले. भोंगे यांच्या बाबतीत कोणतीही सूचना दिली गेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Congress MLA Upset : काँग्रेसचे आमदार नाराज नाहीत, ही केवळ अफवा - असलम शेख - मुंबई काँग्रेस नेते असलम शेख
राज्यातील काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र प्रशिक्षणासाठी गेलेल्या आमदारांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यात गैर नाही. त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची नाराजी व्यक्त केली नाही. महाविकास आघाडीमध्ये आपण नाराज नाही, असा दावा काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी केला आहे.
असलम शेख