महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maratha Reservation : 'प्रश्न आंदोलनातून नव्हे, चर्चेतून सुटतील'; मंत्री अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया - Nanded election

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार योग्य पाऊले उचलत नसल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी निवासस्थानी बाहेर आंदोलन केले होते. त्यापेक्षा आंदोलकांनी मला येऊन भेटले असते, तर त्यांच्याशी मी चर्चा केली असती. हे सर्व प्रश्न आंदोलनापेक्षा चर्चेतून सुटतील असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल आहे.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

By

Published : Jan 19, 2022, 3:22 PM IST

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाबाबतचा दिलेल्या निर्णयानंतर मराठा तसेच ओबीसी आरक्षणाबाबतचा ( OBC Reservation ) पेच निर्माण झालेला आहे. याबाबतची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाची पूर्तता राज्य सरकार करत आहे, असे मतं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या शासकिय निवास्थानाबाहेर आंदोलन ( Maratha kranti Morcha Agitation ) केले. त्यापेक्षा आंदोलकांनी मला येऊन भेटले असते, तर त्यांच्याशी मी चर्चा केली असती. हे सर्व प्रश्न आंदोलनापेक्षा चर्चेतून सुटतील असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार योग्य पाऊले उचलत नसल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी निवासस्थानी बाहेर आंदोलन केले होते.

नांदेड मधील निवडणूक निकाल समाधानकारक -

नांदेड मधील नायगाव नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर अर्धापूर येथे देखील काँग्रेसने उत्तम कामगिरी केली. तसेच माहूरमध्ये देखील काँग्रेसला यश मिळले आहे. राज्यभरात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस तसेच महाविकास आघाडी मधील पक्षांनी चांगली कामगिरी केल्याचे चित्र समोर येत असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details