मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे अनेकजण आपल्याला पुढे काही संधी मिळेल म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, आणि त्यांची ही काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
भाजपामध्ये गेलेले आमदार काँग्रेसमध्ये पुन्हा परततील - अशोक चव्हाण
राज्यात विरोधकांनी कितीही आवई उठवली तरी महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. हे पाच वर्षे चालणारे सरकार आहे. त्यामुळे आपण स्थिर सरकारसोबत रहावे, अशी आमदारांची भावना असणे साहजिक असल्याचेही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
चव्हाण म्हणाले की, भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा आहे, त्याचप्रमाणे मूळचे काँग्रेसचे परंतु निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांची पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पुन्हा काँग्रेसमध्ये परतलो तर पुढे संधी मिळू शकेल, असे वाटणारे काही आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, ते पाच वर्षे चालणार आहे, असा विश्वास त्यांना वाटतो. तो विश्वास सार्थ आहे. त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.