मुंबई - मुंबईत आढळलेल्या एक्सई विषाणूचे ( XE New Corona variant ) नमुने एनआयबीएमजीकडे तपासणीसाठी पाठवणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Guardian Minister Aditya Thackeray ) यांनी दिली आहे. कोणीही घाबरू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. गेट वे येथील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
XE New Corona Variant : एक्स ई विषाणूचे नमुने तपासणीसाठी पाठवणार - आदित्य ठाकरे - पालकमंत्री आदित्य ठाकरे
ज्या रुग्णाला एक्स ईचा संसर्ग ( XE New Corona variant ) झाला होता, तो पूर्णतः बरा आहे. शिवाय संपर्कात आलेल्याचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र खबरदारी घेण्यासाठी संबंधित रुग्णांचे नमुने एनआयबीएमजीकडे तपासणीसाठी पाठवणार आहोत, असे मंत्री आदित्य ठाकरे ( Guardian Minister Aditya Thackeray ) यांनी सांगितले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
![XE New Corona Variant : एक्स ई विषाणूचे नमुने तपासणीसाठी पाठवणार - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14954339-thumbnail-3x2-m.jpg)
आदित्य ठाकरे