मुंबई -मुंबईमध्ये पावसाळापूर्वी कामे सुरु असून ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मी खोटं बोलणार नाही. मोठा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर गुडघ्यापर्यंत पाणी साचू शकत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकममंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Environment Minister Aditya Thackeray ) केले आहे. मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामाचा आढावा ( Municipal Corporation Premonsoon work review meeting ) आदित्य ठाकरे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफीसरांना पुढील दहा दिवस रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.
'त्या' रस्त्यावर खड्डे :रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात यावर बोलताना, पालिकेव्यतिरिक्त इतर यंत्रणांचेही रस्ते आहेत. मुंबईत गेल्या काही वर्षात रस्त्ये काँक्रीटचे केले जात आहेत. गेल्या काही वर्षात नव्याने जिथे रस्ते झालेत तिथे खड्डे पणार नाही मात्र, जिथे जूने रस्ते आहेत. ज्या ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकास आणि इतर कामे सुरु आहेत, तिथे खड्डे होऊ शकतात. मुंबईतील भूस्खलन होते असे डोंगराळ भाग आहेत. मागील वर्षी तीन ठिकाणी भूस्खलन झाले. त्याठिकाणी सुरक्षा भिंती होत्या. मात्र मोठा पाऊस पडल्याने पाण्याची गती अधिक असल्याने त्या भिंतीही तुटल्या होत्या. डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना धोका आहे. लोकांना स्थलांतरित कशा प्रकारे करता येईल हे पाहिले जात आहे. पालिकेकडून ३० हजार पीएपी घरांसाठी टेंडर काढण्यात आले आहे. दरड कोसळू शकते अशा विभागात काम करता यावीत म्हणून ६२ कोटी रुपयांचा फंड दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.