मुंबई -मुंबईत नव्या कोरोनाबाधितांचा ( Corona Virus in Mumbai ) आजचा आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar on Corona ) यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सद्यपरिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन ( Complete Lockdown in mumbai ) करण्याचा कोणताही विचार नाही आहे. पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
मिनी लॉकडाऊन बरा -
मुंबईत कोरोनाच्या प्रसारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिक धास्तावले आहेत. काही बेफिकीर नागरिकांमुळे रुग्ण संख्या वाढत राहिली, तर काही कठोर पावले उचलली जाऊ शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका सज्ज आहे. यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापेक्षा मिनी लॉकडाऊन बरा ( mini lockdown in mumbai ) असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मिनी लॉकडाऊन परवडण्यासारखा -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला असून रुग्णसंख्या दिवसाला २० हजाराच्या वर रुग्णसंख्या गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मुंबईत काल २०१८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११७० रुग्णांना रुग्णलयात दाखल करावे लागले. सध्या १६.८ टक्के बेडवर रुग्ण असून इतर बेड्स रिक्त आहेत. २२ हजार २२२ बेड्स गंभीर आणि जास्त लक्षण असणाऱ्यांसाठी आहेत. २० हजाराच्यावर रुग्णसंख्या गेल्यावर लॉकडाऊन लावू असे मागे म्हटलं होतं, पण टक्केवारी वाढली तर खूप काळजी घ्यावी लागेल. दुसरी लाट आपण जशी रोखली, तशी रोखण्यासाठी घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत. रुग्णसंख्या लोक धास्तवले आहेत, संपूर्ण लॉकडाऊन सध्या तरी होणार नाही. पण जर काही बेफिकीर नागरिकांमुळे रुग्ण संख्या वाढत राहिली, तर काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. मिनी लॉकडाऊन सगळ्यांना परवडण्यासारखा आहे असे महापौर म्हणाल्या.
मुख्यमंत्री निर्णय घेतील -
मुख्यमंत्री आणि इतर मंत्री माझ्या नागरिकांना कसं वाचवता येईल याबाबत सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतायत. माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि शरद पवार निर्णय घेतील. शनिवार आणि रविवारी मुंबईतून जा ये करणाऱ्यांची संख्या जास्त असते. हळुवार पण खंबीर निर्णय कदाचित संध्याकाळी ७ वाजेपर्यंत येऊ शकतो. मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चालले आहेत. ते घीसडघाईने निर्णय घेणार नाहीत. आज संध्याकाळ पर्यंत कळेल. पंतप्रधान आज संध्याकाळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्यावे -
जागतिक आरोग्य संघटना ओमायक्रॉन गंभीर नाही असे म्हणत आहे. मात्र तो गंभीर नाही असे समजू नका. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आमची यंत्रणा सज्ज आहे, पण सज्ज आहोत म्हणजे त्याचा फज्जा उडवू नका. काही लोक आरोप प्रत्यारोप करतात, मात्र त्यांनीही कोरोना, ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्यावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
गर्दी टाळणे गरजेचे -