महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंधेरीच्या सहार गाव परिसरात बनावट दुधाचा काळा धंदा, छापेमारीत टोळीचा पर्दाफाश - mumbai fdi action

भेसळ दूध विक्री करणारी ही टोळी आधी ब्रँडेड कंपन्यांची दुधाची पाकिटे विकत घ्यायची आणि नंतर ती हलकी कापून अर्धे दूध बाहेर काढायचे आणि त्यात पाणी भरायचे. पाणी मिक्स केल्यानंतर तो पॅकेटला मेणबत्ती किंवा स्टोव्ह पिनच्या मदतीने चिकटवायचे. ती पिशवी अशा प्रकारे चिकटवायची की ग्राहकाच्याही ते लक्षात येत नसे.

बनावट दुधाचा काळा धंदा
बनावट दुधाचा काळा धंदा

By

Published : Sep 2, 2021, 6:34 AM IST

Updated : Sep 2, 2021, 5:18 PM IST

मुंबई- मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि एफडीएने संयुक्तपणे छापा टाकून अंधेरीच्या सहार गाव परिसरात बनावट दुधाचा काळा धंदा करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत शेकडो लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, ही टोळी सुप्रसिद्ध दूध कंपन्यांच्या पिशव्यांमधून भेसळयुक्त दूध विकत होती. ते दूध प्यायल्याने लोकांचे आरोग्यही बिघडू शकते. या कारवाई दरम्यान 325 लिटर नकली दूध जप्त करण्यात आले.

बनावट दुधाचा काळा धंदा
मुंबई गुन्हे शाखा आणि एफडीएच्या उच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या गोपनीय स्रोतांकडून माहिती मिळाली होती, सहार गाव परिसरातील काही लोक ब्रँडेड दूध कंपन्यांच्या पिशव्यामध्ये भेसळयुक्त दूध भरून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत. प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखा आणि एफडीएच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून एका आरोपीस रंगेहात अटक केली. छाप्यादरम्यान आरोपी ब्रँडेड पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरण्याचे काम करत होता. कारवाई दरम्यान, सुमारे 325 लिटर नकली दूध आणि मोठ्या प्रमाणात दुधाच्या पिशव्या जप्त करण्यात आले आहे.

असा चालायचा भेसळीचा धंदा-

भेसळ दूध विक्री करणारी ही टोळी आधी ब्रँडेड कंपन्यांची दुधाची पाकिटे विकत घ्यायची आणि नंतर ती हलकी कापून अर्धे दूध बाहेर काढायचे आणि त्यात पाणी भरायचे. पाणी मिक्स केल्यानंतर तो पॅकेटला मेणबत्ती किंवा स्टोव्ह पिनच्या मदतीने चिकटवायचे. ती पिशवी अशा प्रकारे चिकटवायची की ग्राहकाच्याही ते लक्षात येत नसे. ही टोळी गेली एक वर्ष हा व्यवसाय चालवत होती. सध्या, गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे.

Last Updated : Sep 2, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details