मुंबई - समाजात नेहमी महिलांनाच लक्ष केले जाते. महिलांना लक्ष्य करणे थांबवा. मुलींचे पंख कापू नका, त्यांना मुक्त विहार करू द्या, असा संदेश विश्वसुंदरी हरनाझ संधू हिने आज मुंबईत दिला. अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा विश्वसुंदरी हा किताब जिंकल्यानंतर हरनाझ संधू आज मुंबईत दाखल झाली. यावेळी तिने पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.
हरनाझ माध्यमांशी बोलताना
विश्वसुंदरी हा किताब म्हणजे केवळ तुमचं सौंदर्य नाही सौंदर्य ही केवळ एक टक्का असते. बाकी तुमचा आत्मविश्वास तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची विचार करण्याची पद्धत आणि एकूण समाजाबद्दल असलेली तुमची जाणीव या सर्व घटकांचा मिळून विश्वसुंदरी हा किताब दिला जातो असे हरनाझ संधूने स्पष्ट केले.
हिजाब हा वैयक्तिक प्रश्न
हिजाब वापरायचा की नाही हा महिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे. महिलांना तुम्ही लक्ष्य करू नका. महिलांना मुक्तपणे वावरु द्या, त्याने टीका करून दडपशाही करून त्यांचे पंख कापू नका, असे संधूने हीजाब संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राजकारणातअनेक क्षेत्रातील व्यक्तींचे येणे स्वागतार्ह
पंजाबमधील झालेल्या सत्ताबदला बद्दल विचारले असता हरनाझने सांगितले की तिला स्वतःला राजकारणात जाण्याची अजिबात इच्छा नाही तिला प्रशासकीय सेवेबद्दल आकर्षण आहे. मात्र, सध्या राजकारणात अन्य क्षेत्रातील व्यक्ती येत आहेत आणि मतदार सुद्धा त्यांना मते देऊन प्रोत्साहित करत आहेत ही चांगली बाब असल्याचे तिने म्हटले.