मुंबई- सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडाची ओळख आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून मुंबईतील म्हाडाच्या घरांची एक देखील लॉटरी निघाली नाही. मात्र ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. आता मुंबई जवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेण्याची संधी काही महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. अँटॉप हिलमधील ४५० आणि गोरेगाव पहाडी येथील २६८३ घरांसाठी २०२२ मध्ये सोडत काढण्याचा मुंबई मंडळाचा विचार आहे. तर घरांचा आकडा वाढवण्यासाठी ही मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरांचे स्वप्न म्हाडा अनेक वर्षापासून पूर्ण करत आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून या सोडतीत खंड पडला आहे. २००८ पासून २०१९ पर्यंत सलग १२ वर्षे निघणाऱ्या मुंबईतील सोडतीत कधीही ब्रेक लागला नाही. कोकण मंडळ आणि देखील दसऱ्या च्या बोलता बर लॉटरी काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई मंडळाकडून मात्र सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.