महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडा गोरेगावमध्ये राबवणार 'एसआरए' योजना - मधू चव्हाणांची माहिती - SRA policy

गोरेगाव मोतीलाल नगर भागातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे घेण्यात आला आहे. या संदर्भात म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी माहिती दिली असून, यासाठी निवडलेल्या जागेचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.

गोरेगाव मोतीलाल नगर भागातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण प्राधिकरणातर्फे घेण्यात आला आहे.

By

Published : Sep 20, 2019, 4:01 AM IST

मुंबई- गोरेगाव मोतीलाल नगर भागातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे घेण्यात आला आहे. या संदर्भात म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी माहिती दिली असून, यासाठी निवडलेल्या जागेचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच सध्या स्थानिक रहिवाश्यांचे सामाजिक तसेच आर्थिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून प्लॉट धारकांसह झोपडी धारकांना सर्वेक्षण अर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.

मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासह येथील २ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी 'हाऊसिंग स्टॉक' तयार करण्याचा उद्देश आसल्याची माहिती मधू चव्हाण यांनी दिली. तसेच यातून म्हाडाने संबंधित भूखंडावर स्वत:च झोपडपट्टी पुनर्वसन योजना सक्तीने राबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details