महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमवाय योजनेतून निर्माण होणार १ हजार ९४७ घरे - घरे

खिशाला परवडणा-या दरातील घर विकत घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे.

म्हाडा

By

Published : Mar 6, 2019, 7:01 AM IST

मुंबई -म्हाडाचा ८ हजार २५९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबईत पहाडी गोरेगांव येथे १ हजार ९४७ घरे मुंबई मंडळांतर्गत निर्मिती करण्यात येणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.

म्हाडा

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येक सर्व सामान्य माणसाचे स्वप्न असते. यासाठी म्हाडा प्राधिकरणाने २०१९-२०२० या वर्षाचा अर्थसंकल्पात नव्या घरांच्या निर्मितीचे उद्धिष्ट ठेवले आहे. या चालू वर्षासाठी ८हजार २५९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भविष्यकालीन आवश्यकता विचारात घेता जमीन खरेदी आणि विकासासाठी १००कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच म्हाडाच्या सर्वच मंडळाच्या वसाहतींच्या पायाभूत सुविधांकरिता ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’च्या माध्यमातून इमारतींची देखभाल-दुरुस्ती साठी 5 कोटी 28 लाख रुपये.संक्रमण शिबीराचा पुनर्विकास आणि देखभाल दुरुस्तीसाठी ५कोटी प्रस्तावित असून मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळासह म्हाडाच्या कोकण,पुणे,नागपूर,नाशिक,अमरावती आणि औरंगाबाद मंडळासाठीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details