मुंबई - दक्षिण मुंबईतील 14500 हुन अधिक उपकरप्राप्त इमारतीच्या पावसाळा पूर्व सर्व्हेक्षणाचे काम सद्या म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत सर्व्हेक्षणाचे 68 टक्के पूर्ण झाले आहे. यात सुमारे 9 हजार इमारतीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून दिलासादायक बाब म्हणजे यापैकी एकही इमारत अतिधोकादायक नसल्याची माहिती विनोद घोसाळकर, सभापती, दुरुस्ती मंडळ यांनी दिली आहे. तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करत अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
सर्व्हेक्षणाला कोरोना-लॉकडाऊनचा फटका -
आतापर्यंत 9 हजार उपकरप्राप्त इमारतीचे सर्व्हेक्षण पूर्ण; यात एकही इमारत अतिधोकादायक नाही
दक्षिण मुंबईतील 9 हजार इमारतीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून दिलासादायक बाब म्हणजे यापैकी एकही इमारत अतिधोकादायक नसल्याची माहिती विनोद घोसाळकर, सभापती, दुरुस्ती मंडळ यांनी दिली आहे. तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करत अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरवर्षी साधारणतः मार्चमध्ये या सर्व्हेक्षणाला सुरुवात होते. तर मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करत 15 मे पर्यंत अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर अतिधोकादायक इमारतींना नोटीस पाठवत जूनच्या पहिल्या आठवड्यात रहिवाशांना स्थलांतरित केले जाते. म्हाडाच्या संक्रमण शिबिरात रहिवाशांना हलवले जाते. ज्यांना या संक्रमण शिबिरात जायचे नसते. ते आपली सोय स्वतः करतात. रहिवाशांना बाहेर काढून या इमारती मोकळ्या केल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात इमारत कोसळण्यासारखी कोणतीही दुर्घटना घडली. तर जीवितहानी होऊ नये, हा या मागचा उद्देश असतो. दरम्यान 15 मे ही अतिधोकादायक इमारती यादी जाहीर करण्याची डेडलाईन निघून गेली आहे. याचे कारण अजूनही मंडळाकडून हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले नाही. याचे कारण कोरोना आणि लॉकडाऊन आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येक इमारतीत जाऊन इमारतीची पाहणी करणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वेक्षणाला उशीर होत आहे. गेल्या वर्षी ही हे सर्वेक्षण रखडले होते, अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर होण्यास विलंब झाला होता.
नियंत्रण कक्ष स्थापन -
अतिधोकादायक इमारतीच्या सर्व्हेक्षणाला विलंब झाला आहे. पण या कामाचा वेग आता वाढवण्यात आला असून आतापर्यंत 68 टक्के काम पूर्ण झाले आहे. 14 हजार 755 इमारतीपैकी 9 हजार 48 इमारतीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. यात अजून एकही इमारत अतिधोकादायक नाही. दरम्यान उर्वरित इमारतीचे काम लवकरच पूर्ण करत अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाईल, असे घोसाळकर यांनी सांगितले आहे. त्याचवेळी मंडळाकडून पावसाळ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून तो पालिका, अग्निशमन दल, पोलीस यांच्या नियंत्रण कक्षाशी जोडला गेला आहे. पावसाळ्यात उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना गळतीपासून इमारतीबाबत कोणत्याही अडचणी आल्या वा कोणतीही दुर्घटना घडल्यास या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. ०२२ २३५३६९४५, ०२२ २३५१७४२३ हे या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आहे.
हेही वाचा -सीबीआयने ममता बॅनर्जींना बनवले पक्षकार; पश्चिम बंगालच्या बाहेर खटला वर्ग करण्याची मागणी