मुंबई -दोन वर्षापासून मुंबई जवळच्या म्हाडा कोकण मंडळाची घरांची सोडत लांबली होती. मात्र यावर्षी या सोडतीला मुहुर्त सापडला आहे. दसऱ्याला या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची घोषणा आज दुपारी तीन वाजता होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ही घोषणा करतील. घोषणा केल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुमारे नऊ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
MHADA lottery: म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी, आज निघणार जाहिरात - म्हाडा लॉटरी
ठाणे, कल्याण, नवी मुंबई या भागात घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. म्हाडा आज या भागात परवडणाऱ्या घरांची बंपर लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. या लॉटरीत तब्बल नऊ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज या लॉटरीच्या सोडतीची घोषणा करतील.
म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणे कोकण मंडळाची सोडत ही रखडली होती. कोरोनाचा प्रभाव पडला होता. गेली दोन वर्षे लॉटरी जाहीर होईल, अशी आशा नागरिकांना होती. कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत निघाली होती. आता नऊ हजार घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा संपली आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. आज या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कुठे किती घरे?-
- मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 196 घरे
- वर्तक नगर, ठाणे येथील अल्प गटातील 67 घरे
- विरार-बोळींजमधील 1300 घरे आहेत. त्यातील सुमारे एक हजार घरे अल्प तर उर्वरित घरे मध्यम गटातील
- कल्याणमध्ये 2000 घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी
- गोठेघर, ठाणे – 1200 घरे
- वडवली येथे 20 घरे,
- कासारवडवली 350 घरे अल्प गटासाठी