महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 'या' शहरांत उपलब्ध होणार म्हाडाची घरं - nagpur

नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, कोकण या भागात म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या मुंबईतील ५०९० घराची सोडत जाहिरात काढणार आहोत, असे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

म्हाडाची कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर मंडळासाठी सोडत निघणार, मुंबईच्या पदरी मात्र निराशा

By

Published : Jul 9, 2019, 9:28 PM IST

Updated : Jul 9, 2019, 10:03 PM IST

मुंबई -म्हाडाअंतर्गत आपले घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. म्हाडातर्फे १४ हजार ६२१ घरांच्या सोडतीची जाहिरात १५ ऑगस्टपर्यंत काढण्यात येणार आहे. मात्र, या जाहिरातीत मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या घरांचा समावेश नसणार आहे. यामागचे कारण म्हणजे म्हाडाकडे मुंबईत हाऊसनिंग स्टॉकच उपलब्ध नाही.

नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोकण या भागात म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. तसेच गिरणी कामगारांच्या मुंबईतील ५०९० घराची सोडत जाहिरात काढणार आहोत, असे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

संक्रमण शिबिरातील इमारतींना पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री टाकण्यात येणार आहे. कन्नमवार नगर येथील ही इमारतींचा समावेश आहे. तसेच मुंबईतील म्हाडा वसाहतील इमारतींचा पुनर्विकास हा म्हाडाकडून करण्यात येणार आहे. ३३/५ अंतर्गत म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाबद्दल एक समिती गठित केली आहे. या समितीने ८ दिवसात निर्णय घ्यायचा आहे. या निर्णयाला प्राधिकरणाने मंजुरी द्यावी, असा निर्णय घेतला आहे.

सेवा शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेणारी समिती ही धोरणाबाबत निर्णय घेणार आहेत. पत्रकार, म्हाडा कर्मचारी यांच्या घराबाबत पुढील प्राधिकरणात चर्चा करणार आहोत. प्राधिकरणाची बैठक दर सोमवारी होणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. पुनर्विकास करताना कोसपर्स फंडसाठी कसा देऊ शकतो, यासाठी विचार करणार आहोत, असेही ते म्हणाले.

Last Updated : Jul 9, 2019, 10:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details