मुंबई -राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असून मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी कोरोना आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. सरकारने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'ही विशेष मोहीम सुरू करत राज्यातील घराघरातील लोकांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. आता म्हाडानेदेखील म्हाडा कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. म्हाडातील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची अँटीजन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करत त्यांना आवश्यक ती मदत म्हाडाकडूनच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यभरातील म्हाडा कर्मचाऱ्यांची होणार मोफत कोरोना चाचणी - Mhada employee corona test
राज्यात 2 हजार 500 कर्मचारी असून यात मुंबईतील 1300 जण आहेत. या सर्वांच्या अँटीजन टेस्टला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. मुंबईत म्हाडा मुख्यालयात टेस्ट होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची मोफत टेस्ट केली जाणार आहे.
कोरोनामुळे म्हाडा कार्यालय आणि म्हाडाची कामे बंदच होती. पण म्हाडावर 3 कोवीड सेन्टर बांधण्याची जबाबदारी होती. त्यामुळे काही अधिकारी-कर्मचारी एप्रिलपासून कामावर येत आहेत. मे-जूनपासून 15 टक्के आणि आता 50 टक्के क्षमतेने कामे सुरू झाल्याने म्हाडा कार्यालये आता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भरू लागली आहेत. शिवाय आता नागरिकांची ये जा वाढू लागली आहे. सॅनिटायझर्ससह अन्य सर्व उपाययोजना म्हाडात करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता म्हाडाने आता आपल्या कर्मचारी-अधिकाऱ्याची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात 2 हजार 500 कर्मचारी असून यात मुंबईतील 1300 जण आहेत. या सर्वांच्या अँटीजेन टेस्टला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. मुंबईत म्हाडा मुख्यालयात टेस्ट होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची मोफत टेस्ट केली जाणार आहे. यात कोणी बाधित आढळला तर त्याची पुढे आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी कार्यकारी अभियंत्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हाडाचा हा निर्णय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद मानला जात आहे.