महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्हाडा संक्रमण शिबिरार्थींना दिलासा, अभय योजनेला वाढ - मुंबई लेटेस्ट न्यूज

भाडे आणि व्याज थकवणाऱ्या रहिवाशांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार म्हाडाला आहेत. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून अशी कारवाई करण्यात येत नाही.

म्हाडा संक्रमण शिबिरार्थींना दिलासा
म्हाडा संक्रमण शिबिरार्थींना दिलासा

By

Published : Apr 30, 2021, 10:40 AM IST

मुंबई - म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील 21 हजाराहून अधिक
रहिवाशांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. संक्रमण शिबिराचे भाडे आणि व्याजाची थकीत रक्कम भरण्यासाठीची अभय योजना वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १ मे २०२१ ते३१ जुलै २०२१ या कालावधीत संपूर्ण थकीत भाडे भरल्यास व्याजावर ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

129 कोटींची थकबाकी -

अतिधोकादायक जुन्या उपकर प्राप्त इमारतीतील तसेच कोसळलेल्या उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले जाते. त्यानुसार अधिकृत रहिवाशांकडून 500 रुपये तर घुसखोर-अनधिकृत रहिवाशांकडून 3000 रुपये महिना भाडे घेतले जाते. तर हे भाडे न भरल्यास त्यावर व्याज आकारले जाते. दरम्यान भाडे आणि व्याज थकवणाऱ्या रहिवाशांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार म्हाडाला आहेत. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून अशी कारवाई करण्यात येत नाही. अशावेळी याउलट त्यांना दिलासा देत त्यांनी थकबाकी भरावी यासाठी म्हाडाकडून अभय योजना राबविण्यात येत आहे.

भाडे आणि व्याजाच्या रकमेच्या पोटी अंदाजे 129 कोटीची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी म्हाडाने याआधी दोनदा अभय योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात 60 टक्के सवलत तर दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के सवलत व्याजात देण्यात आली होती. तर आता तिसरा टप्पा सुरू करत 40 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

दोन टप्प्यात 5 कोटी 31 लाख वसूल

फेब्रुवारी-मार्चदरम्यान अभय योजनेचा पहिला-दुसरा टप्पा राबविण्यात आला. लॉकडाऊनमुळे नागरिकांसमोर उभे ठाकलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय म्हाडाने घेतला. त्यानुसार दोन टप्प्यात 5 कोटी 31 लाखांची वसुली झाली आहे. तर आता 1 मे पासून तिसरा टप्पा सुरू होणार असून यात 40 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. हा टप्पा 31 जुलै पर्यंत सुरू राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details