मुंबई - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा ( Winter Session ) कार्यक्रम जाहीर झाला असून मुंबईत येत्या २२ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनात १२ बिले, ११ विधेयके, तारांकित प्रश्न मांडले जातील, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब ( Parliamentary Affairs Minister Anil Parab ) यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) स्वतः अधिवेशनाला हजर राहणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीमुळे अधिवेशन मुंबईत घेतल्याचे ते म्हणाले. आज संसदीय विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्यानंतर मंत्री परब प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक -
राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच येत्या २२ डिसेंबर पासून सुरु होईल. दुसरा आठवड्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी अधिवेशनाचा तास भरेल. तसेच अधिवेशन वाढवायचे की नाही, यावर २४ डिंसेबरला होणाऱ्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे परब यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण १२ बिले, ११ विधेयके, तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असे मंत्री परब यांनी सांगितले. कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना अधिवेशनात प्रवेश दिला जाईल. आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक ( RT PCR test compulsory) असल्याचे मंत्री परब म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात?
हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची प्रथा आहे. परंतु, अधिवेशन मुंबईत होत असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः अधिवेशनाला हजर राहणार आहे. डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्याचे आज निश्चित करण्यात आले. विरोधकांनी यासाठी संमती दर्शवली. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची सूचना मांडली. येत्या २४ डिसेंबरला त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब म्हणाले.
कामगारांच्या नुकसानीची जबाबदारी घेणार का - परब
एसटी आंदोलनावर देखील मंत्री परब यांनी खुलासा केला. एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कोण करतय, याचे आम्हाला घेणे देण नाही. आम्हाला कामगारांचा प्रश्न वाटत आहे. जे या आंदोलनाची जबाबदारी घेत आहेत, त्यांनी होणाऱ्या नुकसानीची ही जबाबदारी घ्यायला हवी. विलिनीकरणासाठी समिती गठित केली आहे. त्यामुळे सध्या काहीच करता येत नाही. काहीजण कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावत आहेत, असेही परब म्हणाले. पगार वेळेवर देण्याचा निर्णय घेतला. परंतु, कामगार विलिनीकरणावर ठाम आहेत. कामगारांचे यात नुकसान होत आहे. कोणत्याही नेत्याचे नुकसान होत नाही. कालपर्यंत १८ हजार कर्मचारी परत कामावर आले आहेत. सुमारे एक हजार एसटी धावल्याचे, परब यांनी सांगितले. तसेच एका कर्मचाऱ्याने दगडफेक करुन आपल्या रोजी राटी वरती लाथ मारली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केल्याचे मंत्री परब यांनी सांगितले.
हेही वाचा -Rajesh Tope on School Opening : शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे