मुंबई-शासकीय वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी त्यांच्यासोबत होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मेस्माची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही तीनही कंपन्यांना देण्यात आले आहेत.
संप मागे घेण्याचे आवाहन करूनही वीज कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे आंदोलनकर्त्या संघटनांशी मंगळवारी होणारी बैठक रद्द करीत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut on Strike ) यांनी केली आहे. जनतेलाला वेठीस धरले तर कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा उर्जामंत्री राऊत ( Nitin Raut warning to employees ) यांनी वीज कर्मचारी संघटनांना ( power workers unions ) दिला. तिन्ही वीज कंपन्या संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कठोर कारवाई करतील, असेही त्यांनी जाहीर केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व कर्मचारी संघटनासोबत उद्या दुपारी ३ वाजता मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, रात्रीपर्यंत वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने उद्या दुपारी होणारी ही बैठक रद्द करण्याचा निर्णय राऊत यांनी घेतला आहे.