महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीन्स-टीशर्ट बंद! सरकारकडून कार्यालयात  ड्रेसकोड बंधनकारक - महाराष्ट्र सरकारी कर्मचारी ड्रेसकोड

राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्या रंगाचा ड्रेस कोड असावा आणि तो कसा असावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात हजर राहताना ड्रेस कोड सक्तीचा होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात टी शर्ट जीन्स,गडद रंगाचे कपडे तसेच नक्षीकाम अथवा विविध प्रकारच्या डिझाईन असलेले कपडे वापरता येणार नाहीत.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Dec 11, 2020, 7:22 PM IST

Updated : Dec 11, 2020, 8:39 PM IST

मुंबई - राज्य सरकारने मंत्रालयासह सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे आदेश काढले आहेत.
कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख असावी, यासाठी ठराविक रंगाचा ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्या रंगाचा ड्रेस कोड असावा आणि तो कसा असावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात हजर राहताना ड्रेस कोड सक्तीचा होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना यापुढे आपल्या कार्यालयात टी शर्ट जीन्स,गडद रंगाचे कपडे तसेच नक्षीकाम अथवा विविध प्रकारच्या डिझाईन असलेले कपडे वापरता येणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरकारी कार्यालयातील कर्मचारी ठरवून दिलेल्या ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.


काय म्हटले आहे परिपत्रकात?

  • सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, सरकारी कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी-कर्मचारी (प्रामुख्याने कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणाऱ्या व्यक्ती) हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना कर्मचाऱ्याला अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.
  • सर्व सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो.

या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी (ज्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना विविध शासकीय परिपत्रकान्वये गणवेष नेमून देण्यात आले आहेत.

असा असेल ड्रेस कोड

१) महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार,चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.

२) पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान कर नयेत.

३) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर कार्यालयामध्ये करु नये. केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

एक दिवस खादीचा पेहराव हवा-

खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यापूर्वीच्या परिपत्रकान्वये कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

यापुढे स्लीपरचा वापर नको

महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचारी यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपर्सचा वापर करु नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच सर्व राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्त केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून सरकारी कामासाठी येणाऱ्या व्यक्ती यांनाही हा ड्रेसकोड लागू असणार आहे.

दरम्यान, शिर्डी येथील साई बाबा संस्थानमध्ये भाविकांसाठी भारतीय पेहराव बंधनकारक करण्यात आल्याने वादाचा विषय झाला होता.

Last Updated : Dec 11, 2020, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details