महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MH gov GR for ST Employees : सेवेत रुजू झाल्यास राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 'हा' मिळणार दिलासा - एसटी कर्मचारी निलंबन

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत 54 दिवस संप ( ST employees strike update news ) सुरू ठेवला. न्यायालयाने याबाबतची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, या संदर्भातील परिपत्रक ( Gov relief to Suspended employees ) जाहीर करावे, अशी एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Dec 22, 2021, 12:41 AM IST

मुंबई - एसटीच्या विलनीकरणावर ठाम राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने शेवटचा ( Ultimate to ST employees by gov ) अल्टीमेट दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपर्यंत सेवेत रुजू व्हावे. नियोजित वेळेत दाखल झाल्यास त्यांच्यावर आतापर्यंत केलेली कारवाई तात्काळ मागे घेतली जाईल, असे परिपत्रक राज्य सरकारने ( MH GR for ST employees ) काढले आहे.


विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत 54 दिवस संप सुरू ठेवला. न्यायालयाने याबाबतची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, या संदर्भातील परिपत्रक जाहीर करावे, अशी एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यानुसार राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा-MSRTC Workers Strike : न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य असेल - एसटी कर्मचारी

  • राज्य सरकारने काय म्हटले आहे परिपत्रकात?
  • आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबर २०२१ पर्यंत कामावर हजर व्हावे.
  • जे कर्मचारी मराठवाडा, अमरावती व नागपूर प्रदेशात कार्यरत आहेत, त्यांनी २३ डिसेंबर २०२१ पर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे.
  • जे कर्मचारी विहित कालमर्यादित आगारात हजर होतील त्यांना कर्तव्यार्थ हजर करून घेऊन कामगिरी देण्याचे आदेश दिले आहेत.
  • आगारातील वाहतुक पूर्ववत सुरू झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात येईल.
  • ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आले आहे, त्यांना शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फी, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई केली आहे, ती तात्काळ मागे घ्यावी असे निर्देश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची संप कालावधीत अन्य ठिकाणी बदली केली आहे, ते कर्मचारी नियोजित वेळेत मूळ आगारात हजर झाल्यानंतर त्यांचे बदली आदेश तात्काळ रद्द केले जाणार आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या विरोधात संप कालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत. ते कामावर रुजू झाले तर त्यांच्याबाबतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे मागे घेणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून अभय मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा-HC on ST Workers Strike : एसटीच्या विलीनीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा - सदावर्ते

एसटी महामंडळाने अशी केली आहे कारवाई-

निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ही 10 हजार 818 वर जाऊन पोहोचली ( Total ST employees suspended in strike ) आहेत. एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. महामंडळाने आतपर्यंत राेजंदारीवरील 2 हजार 58 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. तर 10 हजार 818 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या शिवाय 2 हजार 859 कर्मचाऱ्यांच्या बदल्या ( transfers of ST employees during strike ) केल्या आहेत. एसटी महामंडळाचा 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा-ST Workers Strike : पुण्यातील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details